Ph: 02452-299294

gmcparbhani@gmail.com

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी

CLICK TO CALL

अवयवदान जनजागृती अभियान-2024

दि. 3 ऑगस्ट 2024 या दिवशी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, मुंबई यांच्या आदेशान्वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी व जिल्हा सामान्य रुग्णालय , परभणी यांच्या अंतर्गत अवयवदान जनजागृती अभियान-2024 ही मोहीम राबविण्यात आली.
दरवर्षी अवयवदानाचे महत्त्व संबोधित करण्यासाठी आणि अवयवदान करण्यासाठी संबंधित गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येतो.
हा दिवस लोकांना मृत्यूनंतर त्यांचे निरोगी अवयवदान देण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. समाजामध्ये अवयवदानाचे महत्त्व, त्याचे फायदे व त्यासाठी असणारी प्रक्रिया याविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने साजरा करण्यात येतो.

या मोहिमेला 11 जुलै ला सुरुवात झाली, त्या अंतर्गत रांगोळी स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, निबंध स्पर्धा, कविता स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा इत्यादी आयोजित केल्या होत्या.
या स्पर्धेमध्ये सर्व एमबीबीएस विद्यार्थी व शासकीय नर्सिंग महाविद्यालय येथील विद्यार्थी, परिचारिका, परिसेवका यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

आज 03 ऑगस्ट 2024 रोजी अवयवदान जनजागृती अभियान रॅली राबविण्यात आली.
ही मोहीम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी व जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी यांच्या अंतर्गत राबविण्यात आली.
या रॅलीसाठी आदरणीय अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, उप-अधिष्ठाता डॉ. शितल राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लक्कमवाड अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सारिका बडे व विविध विषयाचे विभागप्रमुख डॉ. सोनाली कुलकर्णी डॉ. कल्याणी मलशेटवार, डॉ. प्रज्ञा गुरुडे , डॉ. अनिता जाधव, डॉ. सचिन गरुड, डॉ. अब्दुल तांबोळी, डॉ. सुरेखा पवार, शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती. आशा घोडके, पीएचएन अलका मानकर, प्रशासकीय अधिकारी श्री. राजा लखमवाड व श्री. व्ही. व्ही. वंजे व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथील जनऔषधवैद्यकशास्त्र विभागातील डॉ. सोनाली कुलकर्णी, डॉ. अखिल सोनी, डॉ. हरिभाऊ गायकवाड, डॉ.पुनम डंभारे व डॉ. गोविंद पावडे यांनी प्रयत्न केले.
या वेगवेगळ्या स्पर्धेमधील विजेत्याना मा. अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले

.