आज दि. 04 फेब्रुवारी 2025 रोजी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी अंतर्गत “100 days action plan” या मोहिम कार्यक्रमाच्या अनुषंगाने आदरणीय अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे सर व सहयोगी प्राध्यापक डॉ. सोनाली कुलकर्णी , डॉ आनंद आरदवाड सर, जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग यांच्या मार्गदर्शनाने अवयवदान जनजागृती मोहीम कार्यक्रम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी या ठिकाणी यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला होता.. डॉ. अखिल सोनी, सहाय्यक प्राध्यापक, जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग यांनी अवयवदान जनजागृती या विषयावर तेथील विद्यार्थ्यांना, शिक्षक व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले.. या अवयवदान जनजागृती मोहीम कार्यक्रमाला सहाय्यक प्राध्यापक डॉ. पूनम डंभारे, डॉ. हरिभाऊ गायकवाड, सांखिकितज्ञ शिल्पा पंडित मॅडम, आरोग्य समाजसेवक श्री. सुभाष सोनाळे सर, शीतल करवलकर मॅडम, व श्री. साहेबराव मलदोडे सर, अनिकेत नंदनवारे, बालाजी घुले, विलास कच्छवे व फोटोग्राफर विशाल यांनी सहभाग घेतला व हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला..
सर्व टीम चे मनःपूर्वक आभार..